
नंदुरबार जिल्ह्यात कालपासून जोरदार आणि सततधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने रेड अर्लट घोषित केला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील (तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर, शहादा, नंदुरबार) नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.
धोक्याची स्थिती:
अनेक नागरिक पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नदी-नाले, पूल व काठांवर गर्दी करत आहेत. मात्र, पाण्याचा वेग खूप अधिक असल्याने तोल जाऊन बालक, महिला व पुरुष वाहून जाण्याचा धोका संभवतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
नागरिकांना प्रशासनाचा इशारा:
⦁ घराबाहेर फक्त अति आवश्यक कामासाठीच बाहेर पडा.
⦁ सुरक्षित व अत्यावश्यक वाहनच वापरा.
⦁ वाहत्या पाण्यातून रस्ता किंवा पूल ओलांडू नका.
⦁ कोणत्याही परिस्थितीत नदी-नाले, पूल व काठांवर गर्दी करू नका.
⦁ धोकादायक ठिकाणी जाणे टाळा.
⦁ ‘सचेत’ अॅप डाऊनलोड करून सतत अपडेट राहा.
आज, २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अर्लट राहणार आहे. पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महत्वाचे तालुका नियंत्रण कक्ष क्रमांक:
1. तळोदा: 02567-232367 / 9011327270
2. अक्कलकुवा: 02567-299326 / 9923158404
3. शहादा: 02565-224500 / 9420440030
4. नवापूर: 02569-299149 / 9307099483
5. अक्राणी: 02595-220232 / 9403451207
6. नंदुरबार: 02564-232269 / 7588738070
जिल्हा नियंत्रण कक्ष:
⦁ नंदुरबार: 02564-210006 / 8275313833
⦁ पोलीस नियंत्रण कक्ष: 02564-210113
आपत्कालीन हेल्पलाईन:
⦁ 112 – आपत्कालीन सेवा
⦁ 100 – पोलीस
⦁ 102 / 108 – रुग्णवाहीका सेवा
सर्व नागरिकांना विनंती:
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपत्कालीन परिस्थितीत वर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा.
#NandurbarRainAlert#RedAlert#मुसळधारपाऊस#FloodWarning#StaySafeNandurbar#DisasterPreparedness#सावधरहा#EmergencyContacts#WeatherAlert#NandurbarDistrict#RainSafety#पावसाचीमाहिती