नंदुरबार जिल्ह्यात सतत पावसाचा मारा — हवामान विभागाकडून रेड अर्लट, नागरिकांनी खबरदारी घ्यावी!

नंदुरबार जिल्ह्यात कालपासून जोरदार आणि सततधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने रेड अर्लट घोषित केला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील (तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर, शहादा, नंदुरबार) नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. धोक्याची स्थिती: अनेक नागरिक पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नदी-नाले, पूल व काठांवर गर्दी करत आहेत. मात्र, पाण्याचा वेग खूप अधिक असल्याने तोल जाऊन बालक, […]
नंदुरबार जिल्ह्यात सतत पावसाचा मारा — हवामान विभागाकडून रेड अर्लट, नागरिकांनी खबरदारी घ्यावी!
Continuous rains in Nandurbar district — Red alert from Meteorological Department, citizens should be careful!

नंदुरबार जिल्ह्यात कालपासून जोरदार आणि सततधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने रेड अर्लट घोषित केला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील (तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर, शहादा, नंदुरबार) नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.

धोक्याची स्थिती:

अनेक नागरिक पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नदी-नाले, पूल व काठांवर गर्दी करत आहेत. मात्र, पाण्याचा वेग खूप अधिक असल्याने तोल जाऊन बालक, महिला व पुरुष वाहून जाण्याचा धोका संभवतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

नागरिकांना प्रशासनाचा इशारा:

⦁ घराबाहेर फक्त अति आवश्यक कामासाठीच बाहेर पडा.

⦁ सुरक्षित व अत्यावश्यक वाहनच वापरा.

⦁ वाहत्या पाण्यातून रस्ता किंवा पूल ओलांडू नका.

⦁ कोणत्याही परिस्थितीत नदी-नाले, पूल व काठांवर गर्दी करू नका.

⦁ धोकादायक ठिकाणी जाणे टाळा.

⦁ ‘सचेत’ अॅप डाऊनलोड करून सतत अपडेट राहा.

📍 आज, २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अर्लट राहणार आहे. पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महत्वाचे तालुका नियंत्रण कक्ष क्रमांक:

1. तळोदा: 02567-232367 / 9011327270

2. अक्कलकुवा: 02567-299326 / 9923158404

3. शहादा: 02565-224500 / 9420440030

4. नवापूर: 02569-299149 / 9307099483

5. अक्राणी: 02595-220232 / 9403451207

6. नंदुरबार: 02564-232269 / 7588738070

जिल्हा नियंत्रण कक्ष:

⦁ नंदुरबार: 02564-210006 / 8275313833

⦁ पोलीस नियंत्रण कक्ष: 02564-210113

आपत्कालीन हेल्पलाईन:

⦁ 112 – आपत्कालीन सेवा

⦁ 100 – पोलीस

⦁ 102 / 108 – रुग्णवाहीका सेवा

सर्व नागरिकांना विनंती:

आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपत्कालीन परिस्थितीत वर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा.

#NandurbarRainAlert#RedAlert#मुसळधारपाऊस#FloodWarning#StaySafeNandurbar#DisasterPreparedness#सावधरहा#EmergencyContacts#WeatherAlert#NandurbarDistrict#RainSafety#पावसाचीमाहिती

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: