नंदुरबारमध्ये दीपावली पर्वाला उत्साहात प्रारंभ; बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी

वसुबारसपासून (५ नोव्हेंबर) ते भाऊबीज (११ नोव्हेंबर) असा सात दिवसांचा दीपोत्सव साजरा होणार आहे.
नंदुरबारमध्ये दीपावली पर्वाला उत्साहात प्रारंभ; बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी
Diwali-Celebrations-Nandurbar-Markets-Buzz
  • बाजारपेठेतील चित्र: गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदी-विक्रीची लगबग सुरू आहे. आकाशकंदील, आकर्षक विद्युत रोषणाईचे साहित्य, कपडे, दागिने आणि फराळाच्या साहित्याने दुकाने सजली आहेत.
  • विशेष खरेदी: फराळ बनवण्याच्या साहित्याला मोठी मागणी असून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकानांसमोर मंडप थाटले आहेत. तसेच फटाके विक्री, वाहने आणि इतर महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी शोरूम्समध्ये बुकिंग सुरू झाले आहे.
  • प्रमुख सण व तारखा:
    • ५ नोव्हेंबर: वसू बारस
    • ६ नोव्हेंबर: धनत्रयोदशी
    • ८ नोव्हेंबर: नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन
    • १० नोव्हेंबर: दीपावली पाडवा व बलीप्रतिपदा
    • ११ नोव्हेंबर: भाऊबीज
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: