Home महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने डिजिटल गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने डिजिटल गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी

1
Department of Medical Education and Pharmaceuticals achieves excellent performance in digital governance

पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव धीरज कुमार यांना प्रशस्तीपत्र देऊन विभागाच्या पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिक सेवांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सुधारणांचा गौरव करण्यात आला.

व्हॉट्सअप आधारित चॅटबॉट, क्लिनीकल डिसीजन सपोर्ट सिस्टम (CDSS) साठी AI एजंट्स, छातीच्या एक्स-रेसाठी इमेज ॲनालिटिक्स, गर्दी व्यवस्थापन विश्लेषण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, एमएमसी आणि एमएसडीसीसाठी सुरक्षित प्रमाणपत्रासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान या सर्व उपक्रमांमुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग हा महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ई-गव्हर्नन्स परिवर्तनाचा एक आदर्श नमुना ठरला आहे. यासाठी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले आहे.

#ईगव्हर्नन्स

#सेवाकर्मी

#GoodGovernance