प्रदर्शनात राज्यभरातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), कृषी उद्योजक, संशोधक, कृषी विद्यापीठे तसेच विविध शासकीय संस्थांचा सहभाग असेल. आधुनिक शेतीतील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, पूरक व्यवसाय, पशुधन विकास, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त नवकल्पनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रदर्शनाचा उद्देश आहे.
याशिवाय यशस्वी शेतकरी, संशोधक आणि कृषी उद्योजक यांच्या सहभागातून विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण, कृषी क्षेत्रातील नवोन्मेष, मूल्यसाखळी विकास, कृषी प्रक्रिया आणि ग्रामीण उद्योजकता याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष माहिती कक्ष उभारण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या योजनांची माहितीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल – मंत्री भरणे
















