नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात सी.पी.राधाकृष्णन यांना भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या सोहळ्यानंतर श्री शिंदे यांनी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली.
शपथविधीनंतर उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सी.पी.राधाकृष्णन यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदे यांनी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, “राधाकृष्णनजींचे साधे राहणीमान, मनमिळाऊ स्वभाव आणि उच्च विचारसरणी यामुळे ते बहुआयामी नेते आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी नेहमीच लोकहिताचा विचार केला आहे. उपराष्ट्रपती म्हणून ते या पदाची शान वाढवतील. तसेच त्यांच्या अनुभवाचा देशाला निश्चित लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0000000000000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -207
एक्स वर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi
















