सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड […]
सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न
C.P. Radhakrishnan sworn in as 15th Vice President of India

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली

नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली.

या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड अनेक केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणून श्री राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

0000000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -206

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic / https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: