Home नवापुर जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांचा नवापूर तालुका दौरा : नगरपालिका...

जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांचा नवापूर तालुका दौरा : नगरपालिका आढावा व रोजगार हमी कामांची पाहणी

3
District Collector Nandurbar Dr. Mittali Sethi's visit to Navapur Taluka: Municipality review and inspection of employment guarantee works

(नवापूर)

🏛️गरपालिका भेट व आढावा

जिल्हाधिकारी यांनी नवापूर नगरपालिकेला भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. 🧹♻️ कचरा संकलन डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या, नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मयूर पाटील व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

🌱 रोजगार हमी योजनेची पाहणी

चिंचपाडा येथील वनविभागाच्या रोपवाटिकेची पाहणी करण्यात आली. यावेळी मजुरांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. 🧑‍🌾👂 कामाच्या गुणवत्तेवर समाधान व्यक्त करण्यात आले, भेटीदरम्यान तहसीलदार नवापूर श्री दत्ता जाधव, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

⚙️ प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता

या दौऱ्याद्वारे विविध विभागांच्या कामांची थेट पाहणी करत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे. 🌐✅

#नवापूर#नगरपालिका #रोजगारहमी#जिल्हाधिकारी#प्रशासनजनतेसाठी#सामाजिकसहभाग