Home शेती प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास प्रशिक्षण कार्यक्रम

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास प्रशिक्षण कार्यक्रम

3
Dryland Development Training Program under Prime Minister's National Agricultural Development Scheme

सावरपाडा (ता. तळोदा)

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PMRKVY) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (Rainfed Area Development – RAD) अभियान 2025-26 च्या अनुषंगाने सावरपाडा, ता. तळोदा येथे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणात उप कृषी अधिकारी भरत माळी, सहाय्यक कृषी अधिकारी मदन कायत व प्रशांत वळवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सरपंच श्री. महेंद्र वळवी आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAD हा कोरडवाहू शेती क्षेत्रात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम असून त्याची मुख्य उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

🌱 उत्पादकता वाढवणे: कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे.

🌱 एकात्मिक शेती पद्धती: पीक, पशुपालन, मत्स्यपालन व इतर पूरक व्यवसायांचा समावेश करून हवामान बदलांमुळे होणारे नुकसान कमी करणे.

🌱 पाण्याचे व्यवस्थापन: शेततळे, बंधारे, जलसंधारण व सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची कार्यक्षम बचत करणे.

🌱 नवीन तंत्रज्ञानाचा वापर: सुधारित बियाणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करणे.

🌱 जोखीम कमी करणे: हवामानातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या जोखमीवर मात करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे.

🌱 रोजगार निर्मिती: कृषी उत्पादनात वाढ करून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.

पूरक व्यवसायांना चालना:

RAD अभियानांतर्गत पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते. समूह आधारित (Cluster-based) दृष्टिकोनातून निवडक शेतकऱ्यांना अनुदान देऊन एकात्मिक शेती पद्धती अंमलात आणली जाते. अल्प व अत्यल्प भूधारक तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने राबवली जात असून, राज्याच्या भौगोलिक परिस्थिती व गरजेनुसार योजनेत लवचिकता ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार कृषी विकास योजना आखण्यास मदत होते.

#PMRKVY#RAD#RainfedAgriculture#Nandurbar#Taloda#AgricultureDevelopment#FarmerTraining#SustainableFarming