Home शैक्षणिक शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज...

शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज आणि कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे

0
Educational institutions must now focus on developing a workforce that is employable, equipped with cutting-edge skills, and aligned with the times, keeping in mind the requirements of the job market.

आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची नव्हे, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’चे उद्घाटन करण्यात आले.

देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था म्हणून रामदेवबाबा विद्यापीठाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणाच्या मूळ उद्देशांशी स्वतःला जोडून ठेवत व्यापारीकरणापासून दूर राहण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. खाजगी संस्था असूनही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो. आज या संस्थेचे विद्यापीठात रूपांतर झाले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात तसेच शिक्षणाला नवा आकार देणाऱ्या देशातील अत्यंत नामांकित विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर येथील ‘एआय सेंटर ऑफ कॉम्पिटन्सी’ स्थापन करण्यास सहकार्य करणार्‍या NVIDIA चे प्रतिनिधी असलेल्या फोर्टराईज बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमला सन्मानित केले.

सन्मानित मान्यवर :

✅जॉन सॅम्युअल, फोर्टराईजचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

✅अशोक श्रीनिवासन, फोर्टराईजचे सेल्स ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष

✅धनराज के., फोर्टराईजचे वरिष्ठ सोल्यूशन आर्किटेक्ट

याप्रसंगी श्रीरामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल, विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस.एस. मंथा, कुलगुरू डॉ. आर.एस. पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

#रामदेवबाबाविद्यापीठ