नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला ३३ वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाल्या. नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, तसेच हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य डॉ. सुमेधा कटारिया ( निवृत्त आयएएएस) प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.
















