Home शेती फार्मर कप २०२६ : निवासी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

फार्मर कप २०२६ : निवासी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

1
Farmer Cup 2026: Registration of farmers for residential training begins

शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व कौशल्य विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या फार्मर कप २०२६ अंतर्गत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरावा. फॉर्म भरताना मोबाईलवर येणारा OTP टाकून फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे. यशस्वी नोंदणीनंतरच प्रशिक्षणासाठी सहभाग निश्चित केला जाणार आहे.

नोंदणीसाठी लिंक :

https://cutt.ly/farmer_reg

संबंधित विभाग, कृषी अधिकारी व विस्तार कर्मचाऱ्यांनी ही लिंक आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

फार्मर कप २०२६ अंतर्गत होणारे हे निवासी प्रशिक्षण शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नवतंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये व अनुभवाधारित मार्गदर्शन देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

#farmercup2026#FarmersTraining