‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १२५ ग्रामीण वाचनालये व अभ्यासिका पुन्हा सुसज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करून अभ्यासासाठी आवश्यक फर्निचर, विविध विषयांवरील उपयुक्त पुस्तके, […]
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज
'Our Abhishek – Reborn': Houses of Knowledge Refurbished

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १२५ ग्रामीण वाचनालये व अभ्यासिका पुन्हा सुसज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करून अभ्यासासाठी आवश्यक फर्निचर, विविध विषयांवरील उपयुक्त पुस्तके, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक साहित्य, तसेच नकाशे व संदर्भ साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शांत, प्रेरणादायी आणि एकाग्रतेस पूरक अभ्यासाचे वातावरण मिळावे, यासाठी सामुदायिक अभ्यासिका व वाचनालये अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. या अभ्यासिकांमुळे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागण्यास, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास तसेच वैयक्तिक व बौद्धिक विकास साधण्यास मदत होत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक युवक, ग्रामपंचायती, वाचनप्रेमी नागरिक आणि प्रशासन यांचा सक्रिय सहभाग लाभत आहे. सामूहिक प्रयत्नांतून ज्ञानाची ही घरे पुन्हा फुलत असून, गावागावात शैक्षणिक चळवळीला नवी दिशा मिळत आहे.

आज या अभ्यासिकांमध्ये पुस्तके आणि फर्निचर पोहोचत आहेत; उद्या याच अभ्यासिकांतून सक्षम विद्यार्थी, जबाबदार नागरिक आणि उज्ज्वल भविष्य घडणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: