
अतिशय स्पर्धात्मक झालेल्या खेळांमध्ये व्यावसायिकता आली आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठांनी खेळ व क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करुन देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावे. समर्थ व शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी खेळ हा महत्त्वाचा घटक आहे. खेळांमधील सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, खिलाडू वृत्ती, संवाद, सहनशक्ती व कठोर परिश्रम करण्याची भावना विकसित होते. महाराष्ट्राकडे क्रीडा विकासाची मोठी ताकद आहे. राज्याने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले आहेत. खेळ आता ‘अभ्यासेतर उपक्रम’ नसून ‘सहअभ्यासक्रम’ झाले आहेत. विद्यापीठांनी खेळांमध्ये ग्रामीण व आदिवासी युवकांनाही सहभागी होण्यास प्रेरित करावे. विकसित भारत निर्माण करण्यात खेळांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यापीठांनी महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर ‘स्पोर्ट्स इकोसिस्टिम’ तयार करावी – राज्यपाल
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे व मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी सादरीकरण केले.















