Home सरकारी योजना तळोदा येथे वनपट्टे धारकांची सुनावणी व “Feeding India” उपक्रमांची पाहणी

तळोदा येथे वनपट्टे धारकांची सुनावणी व “Feeding India” उपक्रमांची पाहणी

2
Hearing of forest land holders and inspection of “Feeding India” initiatives at Taloda

स्थळ: तहसील कार्यालय, तळोदा

आज मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी तळोदा तहसील कार्यालय येथे वनपट्टे धारकांची सुनावणी घेतली. नागरिकांच्या दाव्यांवर प्रत्यक्ष संवाद साधत निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

🟢 त्यानंतर “Feeding India” या स्वयंसेवी संस्थेच्या सेंट्रल किचनच्या प्रस्तावित ठिकाणाची पाहणी करण्यात आली. या उपक्रमाद्वारे बालकांना पोषणयुक्त जेवण उपलब्ध होणार असून, जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

👶 याच उपक्रमाअंतर्गत, तळोदा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचे पुनरविकसन करण्यात येणार आहे. यासाठी आज सोरापाडा १ आणि पिंपरपाडा १ येथील अंगणवाडी केंद्रांची पाहणी करण्यात आली.

👥 उपस्थित अधिकारी:

▪️ कृष्णा राठोड – जिल्हा कार्यक्रम अधिकारी

▪️ दीपक धिवरे – तहसीलदार, तळोदा

▪️ राजू किरवे – गट विकास अधिकारी, तळोदा

▪️ सागर वाघ – बालविकास प्रकल्प अधिकारी, तळोदा

▪️ पवनकुमार पाटील – कार्यकारी अधिकारी, Feeding India

🌱 जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न – पोषण, शिक्षण व विकास यांचं बळ गावपातळीवर पोहोचवण्याचा!

#NandurbarDistrict#FeedingIndia#AnganwadiDevelopment#ForestRights#TALODAVisit#JillhaAdhikariNandurbar#ChildWelfare#PoshanAbhiyan#DistrictInAction