![Higher and Technical Education Minister Chandrakant (Dada) Patil [discussed/announced] various higher education schemes...](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2026/08/Nandurbar-News102-1-640x360.jpg)
शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सूचनांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अपेक्षा मनमोकळेपणे व्यक्त कराव्यात, मात्र सोबतच युवकांनी नेतृत्व घेऊन शासनाच्या उपक्रमांचा अभ्यास करावा, असे आवाहनही केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाजात जाऊन सामाजिक प्रश्नांचा अनुभव घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून किमान एक तास सामाजिक कार्यासाठी द्यावा. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ठोस सामाजिक उपक्रम हाती घेतल्यास त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य, तसेच आर्थिक पाठबळही देण्याची शासनाची तयारी असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह युवकांचा धोरणनिर्मिती प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना, अनुदाने व सवलती यांची माहिती अधिक व्यापकपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. धोरणे जाहीर झाल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहचवण्यासंदर्भात विश्वास, पारदर्शकता आणि प्रभावी संवाद निर्माण होणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नवीन कायदे, निर्णय किंवा शैक्षणिक धोरणांबाबत युवकांची मते जाणून घेण्यासाठी ‘ओपिनियन पोल’ किंवा डिजिटल अभिप्राय यंत्रणा विकसित करण्याची सूचनाही केली. शासनाच्या विविध पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपली मते नोंदविता येतील, अशी अधिक सुलभ व्यवस्था असे मत चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.















