(नंदुरबार) धडगाव येथे पार पडलेला “आशा डे” कार्यक्रम सेवाभाव, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते झाले. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह संचारला.
या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तब्बल 110 आशा सेविका व आशा गट प्रवर्तकांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या निःस्वार्थ सेवेला दिलेली कृतज्ञ सलामी ठरली. तसेच “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानांतर्गत दोन मुलींवर कुटुंब नियोजन स्वीकारणाऱ्या आशाताईंनाही गौरविण्यात आले.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी महोदया यांनी आशा सेविकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या व त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रेरणेतून आशा व आरोग्य विभागाने बालमृत्यू, अर्भकमृत्यू व मातामृत्यू कमी करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. या यशस्वी आयोजनामागे आशा सेविका, गट प्रवर्तक तसेच आरोग्य विभागाच्या टीमचे मोलाचे योगदान राहिले.
“मेहनत इतनी खामोशी से करो, कि सफलता शोर मचा दे…” या ओळींप्रमाणे आशा सेविकांचे कार्य आज अभिमानाने झळकले. हा कार्यक्रम एकता, निष्ठा आणि सेवाभावाचा जिवंत आदर्श ठरला.
#AshaDay#Nandurbar#HealthWorkers#WomenEmpowerment#PublicHealth#BetiBachaoBetiPadhao#TeamWork#Inspiration#Maharashtra#GoodGovernance
















