Home अक्कलकुवा जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम, अक्कलकुवा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम, अक्कलकुवा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

1
Independence Day celebrated with enthusiasm at Jamia Islamia Isha-atul-Uloom, Akkalkuwa.

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम, अक्कलकुवा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत भरलेला होता. यावेळी जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी यांनि देशाचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक तसेच देश आणि समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्यांविषयी महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जामिया संकुलातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर विविध सुंदर, देशभक्तीपर आणि प्रेरणादायी कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी जामिया संकुलातील सर्व कॅम्पसचे जबाबदार पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक -शिक्षिका, सर्व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी देशाची शांतता, एकता, सुरक्षा आणि प्रगतीसाठी विशेष दुआ करण्यात आली आणि दुआनंतर स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.