Home नंदुरबार जिल्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पुरंदर आंतरराष्ट्रीय

1
Keeping in mind the successful experience of building Navi Mumbai International Airport, Maharashtra Airport Development Company (MADC) has decided to build Purandar International Airport.

देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा-२०२७ पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची ९३ वी बैठक मंत्रालयात झाली. बैठकीस एमएडीसीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, आयुक्त विपिन इटनकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीमध्ये एमएडीसीसोबत सिडको, एमआयडीसी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचा सहभाग असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देत सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कुंभमेळा-२०२७ दरम्यान देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येणार असून चार्टर्ड विमानांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा अपेक्षित आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळावरील टॅक्सीवे, एप्रन, एअर कार्गो कॉम्प्लेक्स तसेच इतर आवश्यक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.