Home नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना सुरुवात – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना सुरुवात – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष उपक्रम

1
Kisan Credit Card (KCC) camps begin in Nandurbar district – special initiative to provide relief to farmers

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक व वेळेवर कर्ज मिळावे यासाठी नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना आजपासून सुरुवात झाली आहे. ७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान निवडक ग्रामपंचायतींमध्ये दररोज शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

या उपक्रमात किसान क्रेडिट कार्डचे मंजुरीकरण आणि नूतनीकरण हे जिल्हा प्रशासन व बँकांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.

आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी शिबिरे:

✅ जमाना ग्रामपंचायत – बँक ऑफ महाराष्ट्र, मोलगी शाखा

✅ कौली ग्रामपंचायत – बँक ऑफ महाराष्ट्र, कोराई शाखा

✅ मणिबेली ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खापर शाखा

✅ राजमोही एम ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वाण्याविहीर शाखा

✅ खर्डा ग्रामपंचायत – स्टेट बँक ऑफ इंडिया, अक्राणी शाखा

✅ इच्छागव्हाण ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तळोदा शाखा

✅ काजीपूर ग्रामपंचायत – बँक ऑफ बडोदा, तळोदा शाखा

✅ मालदा ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोरड शाखा

✅ नवागाव ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रतापपूर शाखा

किसान क्रेडिट कार्ड (KCC) म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी, नंतरच्या प्रक्रिया, विपणन, उपजीविकेच्या गरजा व गुंतवणुकीसाठी योग्य आणि वेळेवर कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.

🎯 उद्दिष्टे:

1. पीक लागवडीसाठी अल्पमुदतीचे कर्ज

2. कापणी नंतरचे खर्च

3. उत्पादन विक्रीसाठी विपणन कर्ज

4. शेतकरी कुटुंबासाठी उपभोग गरजा

5. शेतीपूरक उपक्रमासाठी भांडवली खर्च

6. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कर्ज

व्यवहारासाठी माध्यम:

शेतकरी त्यांच्या किसान क्रेडिट कार्डचा वापर खालील माध्यमांद्वारे करू शकतात:

⦁ ATM किंवा मायक्रो ATM मधून पैसे काढता येतील.

⦁ बँकेचे प्रतिनिधी (BC) किंवा विक्रेत्यांकडील मशीनद्वारे व्यवहार करता येतील.

⦁ मोबाईल बँकिंग आणि IVR कॉलच्या माध्यमातून पैसे तपासता किंवा व्यवहार करता येतील.

⦁ आधार कार्डाशी जोडलेले कार्ड असल्यास, बायोमेट्रिकद्वारे व्यवहार शक्य आहे.

पात्रता (Eligibility):

या योजनेचा लाभ खालील प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळू शकतो:

⦁ स्वतःची शेती करणारे वैयक्तिक किंवा संयुक्त शेतकरी.

⦁ तोंडी भाडे कराराने किंवा वाटेकरी पद्धतीने शेती करणारे शेतकरी.

⦁ शेतकऱ्यांचे गट (SHG किंवा JLG) ज्यामध्ये भाडेकरू व वाटेकरी देखील असू शकतात.

आवश्यक कागदपत्रे:

1. २ पासपोर्ट साईज फोटो

2. ओळखपत्र (आधार, PAN, DL, Voter ID)

3. पत्त्याचा पुरावा

4. महसूल विभागाचा जमीनधारणाचा पुरावा

सूचना:

या शिबिरांमध्ये किसान क्रेडिट कार्डचे मंजुरी/नूतनीकरण प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतील. शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#किसान_क्रेडिट_कार्ड#KCC2025#शेतकरी_हित#नंदुरबार_जिल्हा#कृषीविकास#कर्ज_सहाय्य#AgriSupport#districtnandurbar#BankingForFarmers#FinancialInclusion