(नंदुरबार) तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यातील सजांचे कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया 11 ऑगस्ट 2023 ते 7 सप्टेंबर 2023 पावेतो राबविण्यात येत असून कोतवाल भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती, अर्ज तसेच इतर हमीपत्र https://nandurbar.gov.in/…/taloda-sub-divisional…/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे अध्यख कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. (kotwal bharati information website)
कोतवाल भरती : एकुण 13 कोतवाल पदे रिक्त (kotwal bharati)
तळोदा तालुक्यातील 6 सजामध्ये नळगव्हाण, करडे, सोमावल बु. कडेल, मोड, व बोरद तर अक्कलकुवा तालुक्यातील 7 सजामध्ये मोरंबा, ब्राम्हणगांव, रायसिंगपुर, काठी, सिंगपुर बु., मांडवा व डाब असे एकुण 13 राजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत. यासाठी शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या 80 टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच 80 टक्के रिक्त साजामधुन निश्चित झालेल्या साजांत शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही श्री. पत्की यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कोतवाल भरती : तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावेत (kotwal bharati)
उमेदवारांनी संपूर्ण माहिती, अर्ज व इतर अनुषंगीक हमीपत्र काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑफलाईन पद्धतीने संबंधीत तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन अध्यक्ष कोतवाल निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी, तळोदा भाग तळोदा मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.