Home महाराष्ट्र ‘महाराष्ट्रधर्म वाढवूया…मराठीची गुढी उंच उभी करुया..

‘महाराष्ट्रधर्म वाढवूया…मराठीची गुढी उंच उभी करुया..

0
'Let's increase Maharashtra religion...let's raise the standard of Marathi high..'

आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात, यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा… मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !’

#गुढीपाडवा