Home महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’

0
'Mahapasudhan Varta' published by the Animal Husbandry Department of the Government of Maharashtra

डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण, तसेच विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती या मासिकातून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.

पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती झाली असून आतापर्यंत या मासिकाचे ११ अंक प्रसिद्ध झाले आहेत. या मासिकामध्ये राज्यातील विविध भागातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी यशोगाथा, आधुनिक शेळीपालन, कुक्कुटपालन, गो-आधारित शेती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, लसीकरण मोहिमा, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय दौरे व उपक्रम यांच्या माहितीचा समावेश असतो. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाबरोबरच आता हे मासिक महाविस्तार ॲपमध्येही वाचता येणार आहे.

“पशुपालन व दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विभागामार्फत प्रकाशित होणारे हे मासिक पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना व यशस्वी प्रयोगांची माहिती देणारे प्रभावी साधन आहे. महापशुधन वार्ता हे डिजिटल ई मासिक पशुपालक शेतकरी बांधवांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. प्रत्येक पशुपालक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचावे,” असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

#महापशुधनवार्ता