
नंदुरबारमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर घेतलेल्या मुक मोर्चाला काहींच्या गैरवर्तनामुळे हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे, तसेच कायद्याचा आदर करून प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या संदेशात सांगितले की,
जिल्हा प्रशासन तुमच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका.
शांततामय मार्गाने आपली मागणी मांडणे हेच लोकशाहीचे बळ आहे.
जर कोणाकडे घटनेविषयी कोणतीही महत्त्वाची माहिती असेल किंवा तपास प्रक्रियेसाठी सहकार्य करायचे असेल, तर त्यांनी तात्काळ ९६९९७११८७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासन नागरिकांनी दिलेली माहिती पूर्ण गोपनीयतेने हाताळेल.
#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#डॉमित्तालीसेठी#PeaceAppeal#शांततेचेसंदेश#LawAndOrder#NandurbarPolice#StayCalm#NoViolence#लोकशाहीचासन्मान















