नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ आणि आदिवासीबहुल भागात पाणीटंचाई ही अनेक वर्षांपासूनची गंभीर समस्या राहिली आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व ग्रामस्थांना लांब अंतराची पायपीट करावी लागते, तर शेती, पशुपालन आणि ग्रामीण जीवनमानावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या आव्हानांवर शाश्वत उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन जलबंधू’ हा लोकसहभागावर आधारित महत्त्वाकांक्षी जलसंधारण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत गावांतील नैसर्गिक जलप्रवाह, झरे, नाले आणि पाणलोट क्षेत्रांचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून दीर्घकालीन जलव्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. मनरेगा, आदिवासी उपयोजना (TSP), गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार, CSR निधी तसेच विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून LBS, CCT, कंपार्टमेंट बांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, तलाव गाळ काढणे आणि भूजल पुनर्भरणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.
मिशन जलबंधू अंतर्गत धडगाव तालुक्यातील वावी, बोधला, मनखेडी, बिजरी आणि पिंपळबारी ग्रामपंचायतींमध्ये जलसंधारणाची अनेक कामे पूर्ण झाली असून त्यांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
यानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संबंधित गावांना भेट देऊन पूर्ण झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. नैसर्गिक जलस्रोत, झरे, नाले आणि विविध संरचनांची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व स्थानिक गरजा जाणून घेतल्या.
विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम भूजल पातळी वाढविणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे, स्थलांतर कमी करणे आणि ग्रामीण भागात हरित रोजगार निर्मितीला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे.
‘मिशन जलबंधू’ म्हणजे लोकसहभाग, वैज्ञानिक नियोजन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून जलसंपन्न, सक्षम आणि आत्मनिर्भर नंदुरबार घडविण्याचा संकल्प!
#MissionJalbandhu#Nandurbar#WaterConservation#JalSurakshitNandurbar#DrMittaliSethi#Akrani#Dhadgaon#TribalDevelopment#GroundwaterRecharge#SustainableDevelopment#WaterSecurity#JalShakti#ViksitNandurbar#GreenFuture#JanBhagidari
See less
















