Home टेक न्युज ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील एमएसआरडीसी कार्यालयात एमएनआरई...

ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील एमएसआरडीसी कार्यालयात एमएनआरई व महाराष्ट्र ऊर्जा

1
MNRE and Maharashtra Energy at the MSRDC office here under the chairmanship of Minister of State for Energy Meghna Sakore-Bordikar

राज्यशासन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांची प्रभावी, पारदर्शक व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास कटिबद्ध असून, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय व तत्परतेने कार्य करून हे प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पाटोदा सौर ऊर्जा उद्यानासह विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक मंजुरी, ग्रीड कनेक्टिव्हिटी तसेच मुदतवाढीच्या प्रस्तावांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस ऊर्जा विभागाचे अवर सचिव जयंत सागडे, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे संजय कुऱ्हाडे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#सौरऊर्जा