नंदुरबार जिल्ह्यात उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत आयोजित ‘नंदिनी मिनी सरस प्रदर्शन व विक्री – २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील स्वयंसाहायता समूहातील महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि जिद्दीच्या बळावर तयार केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री या माध्यमातून करण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन केवळ विक्रीपुरते मर्यादित नसून ग्रामीण महिलांच्या कर्तृत्व, उद्यमशीलता आणि आत्मनिर्भरतेचा गौरव करणारे व्यासपीठ आहे. स्थानिक उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू आदी विविध उत्पादनांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण स्वतः व आपल्या कुटुंबीयांसह या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. आपल्या एका भेटीमुळे आणि खरेदीमुळे ग्रामीण महिलांना प्रोत्साहन मिळेल तसेच ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी मिळेल.
तसेच, आपल्या परिचयातील नागरिक, मित्रपरिवार व कुटुंबीयांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
ग्रामीण महिलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावण्यासाठी ‘नंदिनी मिनी सरस प्रदर्शन २०२६’ ही एक सुवर्णसंधी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार आणि प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नंदुरबार यांच्याकडून नागरिकांना मनापासून आवाहन करण्यात आले आहे.
आपली एक भेट – ग्रामीण महिलांसाठी मोठे प्रोत्साहन ठरेल!
#NandiniMiniSaras2026#UMED#WomenEmpowerments#SelfHelpGroups#LocalToGlobal
















