त्यासोबतच तीन मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर तयार होत असल्यामुळे संरक्षण, उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे.
विद्यापीठाने भविष्याच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करावा,अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्यूकेशन संस्थेतर्फे नागपूर येथे भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी सुरु होत आहे. संरक्षण विषयक विद्यापीठ कसे असावे तसेच देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी विद्यापीठाची भूमिका यासंदर्भात देशातील नामवंत उद्योजक, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच भारतीय संरक्षण दलातील अधिकाऱ्यांसोबत एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी एअरचिफ मार्शल आर.के.एस. भदुरीया, एअरचिफ मार्शल व्ही.आर. चौधरी, मनोज पांडे, एअर मार्शल शिरिष देव, ले. जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कान्हेटकर, प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे, बाबासाहेब एन. कल्याणी, सत्यनारायण नुवाल, डॉ. जयजित भट्टाचार्य, नितिन गोखले, डॉ. विजय चौथाईवाले, ॲड. सुनिल मनोहर, श्रीहरी देसाई, प्रा. मकरंद कुळकर्णी, महेश दाबक, आशिष कुळकर्णी, नारायण रामास्वामी, संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, राहुल दिक्षित आदी उपस्थित होते.