
राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान तसेच सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. त्यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र जय पवार, स्नुषा ऋतुजा पवार आदी उपस्थित होते.















