Home क्रीडा दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या बारामतीच्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित...

दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या बारामतीच्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरव

1
Baramati athletes who achieved success in the South Asian Karate Championship felicitated by Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar.

बारामती : बांगलादेशातील ढाका येथे नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई कराटे क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारामतीतील जिल्हा क्रीडा संकुल पुणे बारामती येथे सराव करणारी श्रुती करळे आणि आयुष करळे या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी संतोष लवटे, महेश चावले, प्रशिक्षक रवी करळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी दोन्ही खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त करत त्यांनी भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अधिक मोठे यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश त्यांनी वेळ दिला.

या स्पर्धेत श्रुती करळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावून देशाचा गौरव वाढविला. तसेच आयुष करळे यानेही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

या गौरवामुळे बारामतीतील क्रीडापटूंना प्रेरणा मिळणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या स्थानिक खेळाडूंच्या सन्मानामुळे क्रीडा क्षेत्राला निश्चितच नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.