नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात ९ ऑक्टोबरला ‘आर्चरी’ खेळाडूंची निवड चाचणी; ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत सुवर्णसंधी
(नंदुरबार) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी ‘मिशन लक्षवेध’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी आर्चरी (तिरंदाजी) या क्रीडा प्रकाराची निवड करण्यात आली असून, जिल्हा क्रीडा संकुल येथे 'जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र' सुरू करण्यात येणार आहे.
या अनिवासी प्रशिक्षण केंद्रासाठी पात्रताधारक खेळाडूंची निवड चाचणी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गुणवंत खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे-निंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
खेळाडू निवडीचे मुख्य निकष:
-
- वयोमर्यादा: संबंधित वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी खेळाडूचे वय २१ वर्षांपर्यंत (मुले व मुली) असणे आवश्यक.
- रहिवासी: खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- क्रीडा पात्रता: खेळाडूने किमान राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा पदक मिळवलेले असावे. (गत दोन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल).
- तंदुरुस्ती: क्रीडा कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती (Fitness) चाचणीत पात्र होणे अनिवार्य. तसेच शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांचे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
-
- जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (LC)
- रहिवासी दाखला (डोमिसाईल) आणि आधारकार्ड
- गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र
- ३ पासपोर्ट आकाराचे फोटो
- शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- पालकांचे संमतीपत्र
अधिक माहितीसाठी संपर्क:
इच्छुक खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह ९ ऑक्टोबर रोजी निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार यांच्याशी ९८५०५५९५०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Us:

