भारतीय कला-संस्कृतीच्या सुरेल विश्वात, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला अनुभवाची जोड मिळून त्यांच्या कलात्मक, सर्जनशील व सांस्कृतिक जाणिवांना प्रोत्साहन मिळाले.अधिवेशनात प्रांजल गावित, वर्षा गावित व साहिल कोकणी (इयत्ता 9वी) तसेच तनुजा वळवी व शशिकांत चौरे (इयत्ता 8वी) यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रमोद गोसावी, TGT (Hindi) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. SPIC MACAY Autumn Convention 2026 मधील विद्यार्थ्यांचा सहभाग हा त्याचाच महत्त्वपूर्ण भाग असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय कला व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख होऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे, असे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारचे प्राचार्य अनिल मंगले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

