Home नंदुरबार नंदुरबार तहसील आवारात अडथळा ठरणार्‍या वाहनांची व्यवस्था करण्याची माहिती अधिकार महासंघाची मागणी

नंदुरबार तहसील आवारात अडथळा ठरणार्‍या वाहनांची व्यवस्था करण्याची माहिती अधिकार महासंघाची मागणी

51
Right to Information Federation's demand for arrangement of vehicles causing obstruction in Nandurbar Tehsil premises
Right to Information Federation's demand for arrangement of vehicles causing obstruction in Nandurbar Tehsil premises

(नंदुरबार) माहिती अधिकार महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांच्या नेतृत्वा खाली नंदुरबार तहसीलदार यांना तहसील आवारात अडथळा ठरणार्‍या वाहनांची व्यवस्था करण्यात यावे याबाबत निवेदन दिले आहे.(Right to Information Federation’s demand for arrangement of vehicles causing obstruction in Nandurbar Tehsil premises)

जिल्ह्यात आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे दबंग अधिकारी पुलकित सिंह यांचे कार्यकाळात नंदुरबार तहसील मध्ये पदावर असताना वाळू माफिया नियम न पाळणारे अधिकृत परवाना धारकांवर व ओव्हरलोड ट्रक, डम्पर, ट्रैक्टर, असे अवजड वाहनांना जप्त करून कठोर कारवाई करण्यात आली होती.

नागरिकांना अडथळा-त्रास (Right to Information Federation’s demand for arrangement of vehicles causing obstruction in Nandurbar Tehsil premises)

मात्र आज तगायत चलान न भरलेल्या वाळू माफियांची व इतर लोकांची वाहने नंदुरबार तहसील मध्ये सर्व मैदान अडवून उभी असल्याने तेथे शासकीय निमित्त ये जा करणारे नागरिकांना खुप अडथळा निर्माण होत आहे. 

सदर त्रासाची दखल घेऊन माहिती अधिकार महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे नेतूत्व खाली तात्काळ तहसीलदार साहेबांना याबाबत निवेदन देऊन अडथळा निर्माण करणारे वाहनांची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.  

निवेदन देतांना, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जयेश बागुल, उपाध्यक्ष प्रफुल सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष सईद कुरेशी, संपर्क प्रमुख जितेंद्र भोई, प्रचार प्रमुख, विशाल महाजन आदी उपस्थित होते.

Right to Information Federation's demand for arrangement of vehicles causing obstruction in Nandurbar Tehsil premises