
(शहादा)
शहादा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापनेच्या मागणीसाठी स्थानिक व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. हे निवेदन तीन प्रतींमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना सुपूर्द करण्यात आले.
प्रथम प्रत मुख्यमंत्र्यांसाठी, तर प्रतिलिपी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांसाठी देण्यात आली. हे निवेदन सनदी लेखापाल (सीए) नरेश संचेती, पारस कुचेरीया, प्रसन्न बंब आणि शरद पटेल यांनी व्यक्तिगतरीत्या सादर केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान, शहादा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापनेची गरज आणि औद्योगिक संधी यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर, एमआयडीसी आवश्यक असल्याचे मान्य करून निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांकडे पाठवले जाईल, असे आश्वासन दिले.
#Shahada#महाराष्ट्रऔद्योगिकविकासमहामंडळ#औद्योगिकविकास#रोजगार#आर्थिकविकास