Home महाराष्ट्र नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) ११वी बैठक मुख्यमंत्री तथा नागपूर महानगर...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) ११वी बैठक मुख्यमंत्री तथा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

1
The 11th meeting of the Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) was held under the chairmanship of Chief Minister and Chairman of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Devendra Fadnavis.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट (ट्रक अँड बस टर्मिनस) विकसित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्र (आयबीएफसी) नवीन नागपूर अंतर्गत विकसित करणे तसेच या दोन्ही प्रकल्पाकरिता हुडकोशी करार करणे व आवश्यकतेनुसार कर्ज मागणी करण्याबाबतचे अधिकार महानगर आयुक्त यांना प्रदान करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली.

बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या सुधारित अंदाजपत्रकास तसेच २०२६-२०२७ च्या अनुमानित अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली. प्राधिकरणाचा ठराव परिचलन पद्धतीने घेत असतांना अवलंब करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांच्या पूर्तीसाठी स्वहिश्यापोटी उभारण्याच्या निधीसाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत कर्ज स्वरूपात निधीबाबत महाराष्ट्र अर्बन इन्फास्ट्रक्चर फंड (एमयूआयएफ) यांनी सादर केलेल्या मुद्यांना मंजुरी देण्यात आली.

नागपूर महानगर प्रदेश क्षेत्राकरिता भविष्यातील लागणाऱ्या पाण्याची निकड लक्षात घेता, गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातून नागपूर महानगर क्षेत्रापर्यत जलवाहिनी टाकण्याकरिता जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रस्तावित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी होत असलेल्या जमिनीचे भूसंपादनाअंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकरीता अधिकचे 10.0 मी. रुंदीचे व अंदाजित 50.0 कि.मी. लांबीचे जमिनीचे अधिग्रहण जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पातअंतर्भूत करण्याबाबत मंजुरी प्रदान करण्यात आली.

यावेळी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सामायिक मुद्रेला मान्यता देण्यात आली व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या लोगोचा वापर व्यापार चिन्ह म्हणून कॉपीराईटसह वापर करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली. नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत सुविधा, आर्थिक नियोजन आणि दीर्घकालीन शहरी विकासाला यामुळे चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.