नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील देशातील पहिल्या ‘एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा’मुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान दिली. कचऱ्यापासून खत व खतापासून बायोगॅस, कंपोस्ट खत, पावर प्लेट्स आदी निर्माण करणारा हा प्रकल्प अत्याधुनिक असल्यामुळे पर्यावरणासाठी आदर्श प्रकल्प म्हणून संपूर्ण भारतात ओळखला जाईल, असा विश्वास […]
या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान दिली.
कचऱ्यापासून खत व खतापासून बायोगॅस, कंपोस्ट खत, पावर प्लेट्स आदी निर्माण करणारा हा प्रकल्प अत्याधुनिक असल्यामुळे पर्यावरणासाठी आदर्श प्रकल्प म्हणून संपूर्ण भारतात ओळखला जाईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे उपमहापौर लीना हातीबेड यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

