Home सरकारी योजना गावकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सांगली जिल्ह्यातील मौजे भडकंबे येथील खडी व...

गावकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सांगली जिल्ह्यातील मौजे भडकंबे येथील खडी व मुरूम उत्खननाबाबतचा अंतिम निर्णय ग्रामपंचायतीचाच असेल

1
The final decision regarding the quarrying of sand and gravel in Bhadkambe, Sangli district, will be taken by the Gram Panchayat, giving top priority to the interests of the villagers.

भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात मांडली. पुढील सात दिवसांच्या आत संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक व प्रत्यक्ष स्थळ पाहणी (स्पॉट इन्स्पेक्शन) करण्यात येईल. स्पॉट पाहणीदरम्यान ग्रामपंचायतीने उपस्थित केलेले सर्व प्रश्न, शंका व गावकऱ्यांना होणारा त्रास याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पाच्या खर्चवाढीबाबत आणि संभाव्य अनियमिततेबाबत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून तीन महिन्यांत चौकशी केली जाईल तसेच दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरू असलेल्या कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू राहील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. सध्याची योजना ही रोजगारासाठी नव्हे, तर प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली योजना निवडणुकीनंतर बंद न करता पाच महिने वाढविण्यात आली. याशिवाय पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अर्थसंकल्पातही ४१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा आधीपासून कार्यरत असून त्याचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली. हरियाणाच्या धर्तीवर राज्यातील शासकीय कार्यालयात स्वतंत्र क्वालिटी अ‍ॅश्युरन्स ॲथॉरिटी स्थापन करणे हा धोरणात्मक स्वरूपाचा निर्णय असल्याने त्यावर सर्व विभागांचा सहभाग घेऊन सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री नाईक यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर (शनिशिंगणापूर) देवस्थानात ऑनलाईन पूजा, चढावा व लाईव्ह दर्शन सेवांमधून मोठ्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

#हिवाळीअधिवेशन

#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

#WinterSession

#WinterSessionNagpur