गोवंश संवर्धन आणि भाकड जनावरांच्या पालनाबाबत शासनाची भूमिका अत्यंत संवेदनशील आहे. गोवंश वाचवायचा असेल तर भाकड जनावरांचे संगोपन महत्त्वाचे आहे.
गोरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. शेतकरी स्वतः जनावरांची वाहतूक करत असताना त्यांची अडवणूक झाली, तर अशा प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. गोशाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. भविष्यात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे […]
गोरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
शेतकरी स्वतः जनावरांची वाहतूक करत असताना त्यांची अडवणूक झाली, तर अशा प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. गोशाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. भविष्यात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे जनावरांची नोंदणी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Follow Us:

