
कृषी अधिकाऱ्यांनीही विभागाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात मार्गदर्शन वेळेत करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालय येथे उप कृषि अधिकारी यांच्या विविध मागण्यांविषयी झालेल्या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवडी, ‘राज्य उपकृषि अधिकारी संघटना, पुणे’चे अध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस विक्रांत परमार, राजकुमार चापले, राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रंढे यासह इतर सदस्य उपस्थित होते.