
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत पूर्ण झाल्याने निवृत्त होणाऱ्या सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या पाच सदस्यांना सभागृहात निरोप देताना ते बोलत होते. सभापतींनी निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.
देशातील मोजक्याच राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात असून महाराष्ट्रालाही ही परंपरा लाभली आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विधानपरिषद करत आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सदस्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची समृद्ध संसदीय परंपरा या सभागृहाने जपली आहे. निवृत्त सदस्य पुढेही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करत राहतील, असा विश्वास असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा – सभापती प्रा. राम शिंदे















