
विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले जावे. प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावली जावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबतच्या आढावा बैठकीत दिले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह, तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉक्सो कायद्याअंतर्गत पीडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा २,२५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधी सुरू केलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.















