तळोदा तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत दोन बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाची शेवटची बॅच दिनांक २३, २४ आणि २५ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडली. प्रशिक्षणाच्या प्रारंभी तळोदा बस स्टँड येथे सर्व शेतकरी बंधू-भगिनींच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी कृषी विभागाचे श्री. नरेंद्र ठाकरे (सहाय्यक कृषी अधिकारी) तसेच उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक सुनील चाटे आणि राजेंद्र बागुल उपस्थित होते.
या प्रशिक्षणात तळोदा तालुक्यातील ३० गावांमधील एकूण ४३ शेतकरी बंधू-भगिनींनी सहभाग नोंदवला. अत्यंत उत्साही, प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात हे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत शेती, जलसंधारण, पीक व्यवस्थापन, सामुदायिक सहभाग आणि कृषी नवकल्पना याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना आधुनिक व परिणामकारक शेती पद्धतींची माहिती मिळाल्याने उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीला चालना मिळणार आहे.
या उपक्रमासाठी कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियानाचे मोलाचे सहकार्य लाभले.
#farmercup2026#PaaniFoundation#UMED#SustainableFarming#collectorofficenandurbar
















