Home महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्तावित सहकारधोरण सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणारे व विश्वासार्ह असेल

राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्तावित सहकारधोरण सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणारे व विश्वासार्ह असेल

0
राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्तावित सहकारधोरण सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणारे व विश्वासार्ह असेल
To make the cooperative sector in the state more capable, dynamic and inclusive, the proposed cooperative policy will be credible and ensure the participation of all

शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळावा, यासाठी कृषी प्रक्रिया उद्योगात सहकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यात यावा. सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी पुनर्रचना, आधुनिकीकरण आणि प्रभावी ब्रँडिंग आवश्यक आहे. शेतमालाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन यामध्ये ग्राहक सहकारी संस्थांचा सक्रिय सहभाग वाढवला तर शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्याची संधी मिळून उत्पादनाला अधिक चांगला दर मिळेल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, समितीचे पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here