
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला याबाबत पत्र लिहून CIIIT उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कंपनीकडून पत्रास सकारात्मक प्रतिसाद देत, यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे.
यामुळे या भागातील स्थानिक युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य, आवश्यक प्रशिक्षण अशा संधी आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील. या केंद्रांमुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल, नवउद्योगांना चालना मिळेल आणि स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमुळे औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षित, कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ युवक मिळतील, नवउद्योगांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था आणि उद्योगविकासाला बळकटी मिळेल, तसेच युवकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे















