स्थळ: मौजे सरदारनगर, ता. तळोदा, जि. नंदुरबार
अंतर्गत योजना: पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प योजना (2025-26)
महिला शेतकरी गटांसाठी कापूस पिकाचे आधुनिक आणि एकात्मिक व्यवस्थापन समजावून सांगण्यासाठी माँ रेवा शेतकरी गटासाठी विशेष शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम तालुका कृषी अधिकारी श्रीमती एम. के. वळवी व मंडळ कृषी अधिकारी श्री वि.एच. निकुम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
प्रारंभ:
शेतीशाळेची सुरुवात शेतकरी प्रतिज्ञा घेऊन आणि ICM (एकात्मिक पिक व्यवस्थापन) साठी टाळी वाजवून करण्यात आली.
तज्ञ मार्गदर्शन:
श्री गणेश सोनवणे (उप कृषी अधिकारी, सोमवाल-2) यांनी एकात्मिक पद्धतीने कापूस पीक कसे व्यवस्थापित करावे, खतांचे संतुलित व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
लघु अभ्यास व प्रयोग:
1. किटकनाशक फवारणी करताना “करावं – करू नये” यावर दृश्य माध्यमाद्वारे प्रात्यक्षिक
2. दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी श्री. मान्या गुंजाऱ्या पावरा यांनी सादर केले.
विशेष सादरीकरण:
श्रीमती स्वाती गावीत (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी CESA (Cotton Ecosystem Specific Approach) संकल्पना समजावून सांगताना, पोस्टर चित्रण व निरीक्षणासह कापसाचे संपूर्ण परिसंस्थात्मक ज्ञान दिले.
शेतकरी सन्मान व संवाद:
⦁ सर्व सहभागी शेतकरी महिलांना शेतीशाळा किट (पेन, पेन्सिल, नोटपॅड, फाईल इ.) वाटप करण्यात आले.
⦁ शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सहभागी महिला शेतकरी:
श्रीमती ज्योती पावरा, कालीबाई पावरा, दुर्गा पावरा व इतर महिला शेतकरींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या उपक्रमामुळे:
महिलांमध्ये शाश्वत शेतीविषयी आत्मविश्वास निर्माण
जैविक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचे प्रबोधन
स्थानिक ज्ञानाचा वापर करून प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण
#महिला_शेतीशाळा#CottonICM#nandurbaragriculture#SustainableFarming#ShetiShala2025#organicsheti#farmertraining#cottonmanagement