Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून

2
The central government has taken an important decision for the welfare of tur farmers in Maharashtra.

राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री श्री. रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले..

या निर्णयानुसार सन २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांकडून आठ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने तुरीची खरेदी केली जाणार आहे. या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे, असेही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

ही खरेदी प्रक्रिया नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी, अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास राज्यातील १०० टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही पणन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.