Home महाराष्ट्र मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

0
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
CM directs to complete infrastructure works on time in Cabinet Infrastructure Committee meeting

गडचिरोली — मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या आज झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर–गोंदिया सोबतच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विस्तारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी थेट आणि जलद संपर्क अधिक बळकट होणार आहे.

याच बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी नवेगाव-मोरे–कोनसरी–मूलचेरा–हेडरी–सुरजागड या महामार्गाच्या सुधारित ८५.७६ किलोमीटर लांबीस व चारपदरी सिमेंट काँक्रिटकरणास मान्यता देण्यात आली आहे. हा महामार्ग खनिज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सुरक्षित, वेगवान आणि सुकर वाहतुकीस चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, तसेच काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या व मंजुरी पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि सुरजागड मार्गाच्या चारपदरीकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, खनिज आधारित उद्योग तसेच एकूणच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here