Home महाराष्ट्र माजी सैनिकांना रेल्वेत रोजगाराची संधी

माजी सैनिकांना रेल्वेत रोजगाराची संधी

0
माजी सैनिकांना रेल्वेत रोजगाराची संधी
Employment opportunities in railways for ex-servicemen

वर्धा: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागामध्ये पॉइंट्समॅन आणि गेटमॅन ही रिक्त 32 पदे पूर्णपणे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी 55 वर्षापर्यंत वय असलेले आणि 10 वी उत्तीर्ण असलेले माजी सैनिक पात्र राहणार आहेत.

लष्करी निवृत्ती कर्मचारी पुरेसे उपलब्ध न झाल्यास, अर्धसैनिक दलातील माजी जवानांच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक पात्र माजी सैनिक आणि अर्धसैनिकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय श्रेणीमध्ये फिट असणे अनिवार्य असून त्यांना मानधन दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.2 फेब्रुवारी पर्यंत srdponagpur@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावे, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here