Home महाराष्ट्र तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत...

तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत असून

0
There are cases of registration of documents on the basis of fake documents by using impersonators.

पार्श्वभूमीवर जनसामान्यांनी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक यांनी केले आहे.

एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात २९ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वतःला सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागेवर भासवणारे मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास यांच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सह जिल्हा निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, करारनामे, विकसन करारनामे आदी सामान्य नागरिकांची कामे नियमित स्वरूपात मोठ्या प्रमाणात केली जातात. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीद्वारे मूळ मालकांची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणतेही व्यवहार करतांना जागरुकता बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.