Home शैक्षणिक भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ...

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट

0
Food, Civil Supplies, and Consumer Protection Minister Chhagan Bhujbal visits the Bhide Wada National Memorial.

पुणे: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज भेट देऊन कामाची पाहणी केली.

स्मारकाच्या उभारणीची प्रगती, वास्तुरचना आणि संवर्धनाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती, विविध टप्प्यांतील प्रगती तसेच पुढील नियोजनाची माहिती मंत्री श्री. भुजबळ यांना दिली.

भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणेच्या आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याने स्मारकाचे काम ऐतिहासिक वारशाचे जतन करत दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, सार्वजनिक बांधकाम (इलेक्ट्रिकल) विभागाचे मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर, उपायुक्त अविनाश सकपाळ, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त तुषार बाबर उपस्थित होते.